ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

२४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करा – मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

मुंबई

मराठा आरक्षण जनजागृती करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू आहे. बुधवारी सकाळपासून अंतरवाली सराटी इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, धारा शिवमधील सभेनंतर जरांगे रात्री उशीरा करमाळा येथील मराठा बांधवांना देखील संबोधित केलं. यावेळी त्यांनी ७० वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली.

राज्य सरकारने मराठा समाजाला  २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करावे अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी करमाळ्याच्या सभेत दिला. माझ्या जीवात जीव असे पर्यंत मी समाजासाठी लढत राहणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय मी एक इंच पण मागे हटणार नाही. एक डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करा, असं आवाहनही मनोज जरांगे  यांनी मराठा बांधवांना केलं.

प्रत्येक गावोगावी लोकांनी माझं स्वागत केलं, त्यामुळे येथे यायला उशीर झाला. मराठा समाज बांधव गाडीला आडवे पडून मला थांबवून माझे स्वागत करत होते. त्यामुळे मला यायला उशीर झाला. इतक्या वेळानंतर ही तुम्ही माझ्यासाठी बसून आहात. नक्कीच तुमच्या या सभेची महाराष्ट्र नोंद घेईल, असं सांगत जरांगे पाटील यांनी सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी ही व्यक्त केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे