ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शाळा उघडताना गेट अंगावर पडलं, विद्यार्थ्यांचा मृत्यु

अहमदनगर

शनिवारी सकाळी शाळा उघडण्यापूर्वीच विद्यार्थी बाहेर जमले होते. शनिवारी सकाळची शाळा असते. त्यामुळे परिसरातील गावांतून सकाळीच विद्यार्थी आले होते.

बस पहाटेच असल्यामुळे काही विद्यार्थी वेळेच्या आधीच शाळेत येतात. त्यानुसार पांडुरंग सदगीर हाही आला होता.

शाळा उघडण्याची वेळ झाल्यानंतर काही विद्यार्थी गेट उघडण्यासाठी गेले. तर काही विद्यार्थी गेटमधून आत प्रवेश करण्यासाठी पुढे गेले होते.

गेट उघडत असताना ते तुटून खाली पडले. गेट पडताना पाहून काही मुले तेथून पळाल्याने वाचली. मात्र, पांडुरंग बाळु सदगीर हा दहावीतला विद्यार्थी गेटखाली दबला गेला. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही.

त्याच्या डोक्याला मार लागला. गेट जड असल्याने मुलांना उचलता येत नव्हते. शिवाय गेट पडल्याने मुले घाबरली होती. त्यानंतर शिक्षक आणि मुलांनी मिळून गेट उचलले. तोपर्यंत सदगीर गंभीर जखमी झाला होता.

त्याच्या डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर बबलु सदगीर हा मुलगा जखमी झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे