ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सणासुदीच्या काळात विजपुरवठा खंडीत केल्यास आंदोलन

संगमनेर

संगमनेर शहरात सध्या विविध भागात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होत असून सणासुदीच्या काळामध्ये अखंड विज पुरवठा सुरू ठेवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर व्यापारी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

याबाबत संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, उपाध्यक्ष सुमेध संत, जुगलकिशोर बाहेती, खजिनदार अरुण शहरकर, संचालक प्रमोद मणियार, तुकाराम लालपोत, व्यवस्थापक अविनाश पुलाटे आदी उपस्थित होते.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या सणासुदीचे दिवस आहे.

दिपावली सणानिमित्ताने बाजारपेठेत गर्दी होवू लागली आहे. सणाच्या काळामध्ये दरारोज कोणत्याही वेळी विजपुरवठा खंडीत केला जातो.

याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरामध्ये, कोणत्याही कारणास्तव विज पुरवठा खंडीत होणार नाही, या बाबतची योग्य ती दक्षता वीज सणासुदीच्या दिवसात वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, परिसरात शहर व परिसरात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याने दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे