ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवाळीत ओप्पोचा हा स्मार्टफोन घ्या

अहमदनगर

Oppo A31 स्मार्टफोन कंपनी Oppo ने २०२० मध्ये Oppo A31 चे ४ जीबी रॅम व्हेरियंट भारतात लाँच केले होते.

कंपनीने आता ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनचे व्हेरिएंट भारतीय बाजारात लाँच केले आहेत.

या दिवाळीत ६ जीबी रॅम असलेला ओप्पो ए३१ स्वस्त दरात मिळणार असून तो १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

Oppo A31 मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२०×१६०० पिक्सल आहे. हे ६ जीबी रॅमसह मीडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसर देखील सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड ९ वर आधारित कलर ६.१.२ ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो.

Oppo A31 चा कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असून १२ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि २-२ मेगापिक्सलचा इतर सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या किंमतीच्या मानाने खूप चांगला कॅमेरा यात येत आहे.

Oppo A31 ची बॅटरी

स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय युजर्संना या स्मार्टफोनमध्ये ४,२३० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Oppo A31 ची किंमत

Oppo A31 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत सध्या १४,९९० रुपये आहे. पण ते कमी किमतीत मिळू शकते. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साईटसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

मात्र, या स्मार्टफोन्सची डिलिव्हरी भारत सरकारने ठरवून दिलेल्या ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असेल. जर तुम्हाला हा फोन कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर येत्या दिवाळीत हा फोन खरेदी करा.

ही कंपनी हा मोबाईल फोन आणखी स्वस्त करणार आहे. याशिवाय बँक ऑफरवर तुम्हाला १,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. या फोनची किंमत जवळपास १०,००० रुपयांपेक्षाही कमी होणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळ च्या मोबाईल स्टोअर ला भेट द्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे