ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आठवणीतल्या जुन्या साडीला जॅकेटस चा साज – महेंद्र शेवाळे, फॅशन डिसाईनर

नाशिक

जुनी पण एखादी सुंदर साडी जी टाकावी वाटत नाही. आईने, सासूबाईने, बहिणीने दिलेली ती छानशी आठवण असते. पण नेहमी नेहमी नेसून कंटाळाही येतो.

पण नेहमी नेसल्या जाणाऱ्या साडीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने ती नसेली वा तीच्यावर ट्रेंडींग जॅकेट, स्टोल वगैरे घेतला तर त्या साडीचा आणि ती नेसणाऱ्या मैत्रीणीचाही लुक बदलतो.

सध्या असाच वेगळा ट्रेण्ड बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या साड्या अगदी ५०० रुपयांपासून ते २५०० हजार रुपयांपर्यंत शिवूनही मिळत असल्याने ट्रेण्डींगमध्ये आहेत. साडी आता केवळ सण वारापुरती उरलेली नाही, तर जॅकेटच्या साथीने ती तरुणाईचे नवीन फॅशन वेपन बनली आहे.

असे आहेत साडीवरील जॅकेट्स

ब्लेझर विथ साडी : साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लेझर घालण्याचा कल वाढला आहे. कंबरपट्टा किंवा बेल्ट लावून हा लूक अधिक रेखीव करता येतो.

एम्ब्रॉयडरी केलेले केप्स: हलक्या साडीवर भरजरी केप जॅकेट घातल्याने रॉयल आणि हटके लूक मिळतो. संगीत किंवा कॉकटेल पार्टीसाठी हा तरुण मुलींचा आवडता पर्याय ठरत आहे.

डेनिम आणि चामड्याचे जॅकेट: कॉलेज फेस्ट किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी कॉटन साडीवर क्रॉप केलेले डेनिम जॅकेट किंवा लेदर जॅकेट एक बोल्ड स्टेटमेंट तयार करते.

लाँगलाईन श्रग्ज: पेस्टल रंगाच्या साड्यांवर फ्लोरल किंवा प्रिंटेड लॉग जॅकेट एक डौलदार आणि बोहो-चिक लुक देतात.

भारतीय संस्कृतीचा सुंदर आधुनिक आविष्कार

साडीवर पैठणी किंवा ट्रेंडिंग जॅकेट घालण्याची परंपरा ही आजच्या भारतीय संस्कृतीचा सुंदर आधुनिक आविष्कार आहे. या लूकमधून परंपरा आणि फॅशन यांचा समतोल साधला जातो महिला उद्योजिका हा पोशाख आत्मविश्वासाने परिधान करतात. अशा प्रकारे संस्कृतीचा सन्मान राखत आधुनिकतेला स्वीकारणं हीच खरी सशक्त आणि प्रेरणादायी वाट आहे.

फॅशन टिप्स :-  कॉन्ट्रास्टचा खेळ –  जर साडी प्लेन असेल, तर जॅकेट भरजरी किंवा प्रिंटेड निवडा.

इम्प्लांट्स आणि दागिने –  या लूकवर गळ्यातले दागिने टाळून केवळ मोठे इअररिंग्स किंवा स्टायलिश बेल्ट वापरल्यास तो अधिक मॉडर्न वाटतो.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे