पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे – उपमहापोर धंनजय जाधव
अहिल्यानगर

बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम स्कुल मध्ये स्नेहसंमेलन संम्पन्न..
प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित बोल्हेगाव येथील किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल च्या स्नेह संमेलन प्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिके चे नवनिर्वाचित उपमहापौर धनंजय जाधव अध्यक्षस्थानी होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कुमारभाऊ वाकळे,नगरसेवक नवनाथ कातोरे, नगरसेविका सौ. आशाताई कातोरे,नगरसेविका सौ. सुनिता भिंगारदिवे, मा. नगरसेवक मदनशेठ आडाव, मा.नगरसेविका सौ.विनाताई बोज्जा, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर, संचालक संदीप ठोंबरे, खजिनदार संदीप गांगर्डे, संचालक सौ. राणी ठोंबरे, संचालक सौ. स्वाती पारगावकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
स्नेह संमेलन मध्ये विदयार्थ्यांकडून अनेक देश भक्तीपीर गीतावर नृत्य बसविण्यात आले. तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटिका प्रदर्शित करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये यावर्षीचे बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड आराध्या इथापे, शिवण्या गोरे, रितिका कदम, गार्गी येणारे, वेदिका जेजुरकर, ओवी यादव,आदिती पाटील, हर्षवर्धन कदम, शिवराज लगड, विराज कलसाईट, हर्षवर्धन येवले, श्रेयांश गांगर्डे, श्रेयश खेडकर, अंश आढाव यांना देण्यात आले. या स्नेहसंमेलनात विदयार्थ्यांच्या पालक महिलांनी सुद्धा सहभागी होऊन नृत्य सादर केले तर शेवटी शाळेतील शिक्षकांनीही नृत्य सादर करून सर्व पालक व श्रोत्यांची मने जिंकलित.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले त्या वेळी त्यानी शाळेबाबत माहिती दिली व शाळेसाठी संस्थेने स्वमालकीची जागा घेतली असून लवकरच त्या ठिकाणी बांधकाम करून शाळा आपल्या स्वमालकीच्या जागेत जाईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना भाटे मॅडम आणि सौ. दिपाली हजरे मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी शाळेच्या मुख्याधापिका संगीता गांगर्डे, शिक्षिका अर्चना चव्हाण, रुपाली जोशी, अनिता गायकवाड, सीमा सोनावणे, पूर्वा भिंगारदिवे, पूजा शिरसाठ, लीना काळे, नीलम पवार पालक प्रतिनिधी विशाल गव्हाणे, सचिन मुसाळे, इंद्रजित चव्हाण, ऋषिकेश वायकर, अमोल गांधले, ईश्वर गांगर्डे, शिवाजी कोलते, शिवाजी हजारे, रोहिदास पवार, निलेश नजन, भरत बनकर महिला मध्ये वाजे मॅडम, कदम भारती, स्नेहल येणारे, अनिता कजबे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमांस मोठया प्रमाणात पालक व बोल्हेगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.




