ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन

पुणे

बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे मुलगी वास्तुविशारद शबनम पूनावाला आणि नात सना वैद्य असा परिवार आहे. सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामात सक्रिय कार्यकर्ते, बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीचे आघाडीचे नेतृत्व ताहेरभाई पूनावाला यांच्या डॉ. झैनब या पत्नी होत.

डॉ. झैनब यांनी ताहेरभाई यांच्यासमवेत बोहरा समाजातील सुधारणावादी चळवळीत उल्लेखनीय काम केले. यामुळे बोहरा समाजाने त्यांच्यावर बहिष्कारही घातला, तरी दोघेही काम करत राहिले. ‘या बहिष्कारामुळे मोठे जग पाहता आले’, असे ताहेरभाई नेहमी सांगायचे.

सामाजिक कृतज्ञता निधी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी यांसह विविध परिवर्तनवादी संस्थांच्या कार्यातही त्या दोघांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. झैनब पूनावाला यांचे पार्थिव एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे सोमवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

यावेळी सामाजिक कृतज्ञता निधीचे विश्वस्त डॉ. बाबा आढाव, अन्वर राजन, डॉ. शमसुद्दीन तांबोळी आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पूनावाला यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. वैद्यकीय संशोधनासाठी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे