ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बुर्‍हाणनगरच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जणांना पकडले

अहिल्यानगर

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने बुर्‍हाणनगर ते नागरदेवळे रोडलगत असलेल्या शेडमध्ये पहाटेच्या वेळी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 जणांना पकडले. त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण सुमारे एक लाख 8 हजार 640 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुर्‍हाणनगर ते नागरदेवळे जाणार्‍या रस्त्यालगतच्या शेडमध्ये काही व्यक्ती विनापरवाना पैशांवर तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती भिंगार कॅम्पच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांना मिळाली होती. त्यानुसार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी शनिवारी (20 जून) पहाटे 1.20 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली असता संशयित जुगार खेळताना आढळून आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार भागवत जायभाय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात संशयित म्हणून दीपक प्रभाकर भगत (रा. बुर्‍हाणनगर), सुरज राजेंद्र चराटे, नवाज आलम शेख (दोघे रा. नागरदेवळे), रंजील जटाप्पा जाधव, धीरज बैजू सोळंकी, विकास बाळू वैरागळ, जाकीर कासम शेख, राहुल सुनील शिंदे, गणेश गोरख गाडेकर, महेश चव्हाण व आकाश भालसिंग (सर्व रा. बुर्‍हाणनगर) यांचा समावेश आहे. सहाय्यक निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे