ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून मराठा आरक्षण मागणीस नगर शहर मराठा डॉक्टर संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा

अहमदनगर

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून मराठा आरक्षण या मागणीस नगर शहर मराठा डॉक्टर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि.३१ ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर मराठा डॉक्टर संघटना आपणास महाराष्ट्र शासन यांना निवेदन देत आहे की अंतरवाली सराट जिल्हा जालना येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून जे प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.

त्यास आम्ही नगर शहर मराठा डॉक्टर संघटना पाठिंबा देत आहोत तरी आपण महाराष्ट्र शासनास आमची मागणी कळवावी असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी डॉ.सचिन पांडुळे,डॉ.अविनाश मोरे,डॉ, मंगेश काळे,डॉ,अरविंद गायकवाड,डॉ.बाबासाहेब शेवाळे,डॉ.रोहित करांडे,डॉ. संदीप अनभुले,डॉ.महेश डोके, डॉ.चंद्रकांत केवळ,डॉ. विजय कवळे,डॉ.दिलीप पवार,डॉ.सुनील बोठे,डॉ.मधुकर गव्हाणे,डॉ.मंगेश जाधव,डॉ.अमित पवार झुंजारराव झांजे इ.उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे