ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सहभागातून १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर - योगातून आरोग्य, आरोग्यातून समृद्धी

अहिल्यानगर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, अहिल्यानगर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसेच विविध योग संस्था व एकविध खेळ संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन रविवार, दिनांक २१ जून रोजी सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मा. ज्योती गाडे (महापौर), मा. दादासाहेब गीते (उपजिल्हाधिकारी), मा. ज्ञानेश्वर खुरांगे (जिल्हा क्रीडा अधिकारी), मा. दिपाली बारस्कर (महिला व बालकल्याण सभापती), मा. वर्षा सानप (महिला व बालकल्याण उपसभापती) यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, अहिल्यानगर महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बालचिमुकल्यांनी विविध योगासनांचे आकर्षक व शिस्तबद्ध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून योगामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधला जातो तसेच निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी असून नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, सकारात्मकता आणि जीवनातील संतुलन साधण्यास मदत होते. याच उद्देशाने उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी समाज व सुदृढ राष्ट्र घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे