ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सुप्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, पाच महिलांची सुटका, चौघांना अटक

अहिल्यानगर - सुपा

दोन हॉटेलवर पोलिसांचे धाडसत्र, दोन मुख्य सूत्रधार फरार, ₹३७ हजारांचा मुद्देमाल जप्त.

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सुपा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन हॉटेलवर छापे टाकून सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या संयुक्त कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य सूत्रधार मात्र फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (१९ जून) ही कारवाई केली.

बनावट ग्राहक पाठवून खात्री, त्यानंतर छापा

पोलिसांना सुपा हद्दीतील पळवे शिवारातील ओम साई हॉटेल आणि राखी पॅलेस लॉजिंग येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रथम बनावट ग्राहक पाठवून माहितीची शहानिशा करण्यात आली. खात्री झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले.

ओम साई हॉटेलमधून दोन महिलांची सुटका

ओम साई हॉटेलवरील कारवाईदरम्यान पोलिसांनी सुनिल लक्ष्मण खोले (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) आणि विनोद विलास मिडाळेकर (मूळ रा. बेळगाव, सध्या रा. ओम साई हॉटेल, पळवे) यांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संग्राम कांडेकर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

राखी पॅलेस लॉजिंगवर दुसरी कारवाई

यानंतर पोलिसांनी राखी पॅलेस लॉजिंगवर धाड टाकली. येथे दीपक सुनार आणि गोवर्धन ओमप्रकाश बुल यांना अटक करण्यात आली. या ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील वैभव साठे (रा. चास, ता. जि. अहिल्यानगर) हा मुख्य आरोपी फरार असून त्याचाही शोध सुरू आहे.

₹३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण ₹३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कमेचा समावेश आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ९९ तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

अधिकाऱ्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णू भागवत, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे तसेच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे