ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सावेडी येथील समर्थ विद्या मंदिर शाळेत साकारले १२५ ‘मातीचे बाप्पा’

अहिल्यानगर- मातीचा बाप्पा… पर्यावरणाचा ध्यास..

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या वतीने ‘मातीचे गणेश, घरातच विसर्जन’ अभियानांतर्गत सावेडी येथील समर्थ विद्या मंदिरात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत १२५ विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. मूर्ती बनवताना कागद, काड्या, पाने, पुठ्ठा आदी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला.

आयुक्त यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला सुरेश क्षीरसागर, ॲड. किशोर देशपांडे यांचे सहकार्य लाभले.

यावेळी प्राचार्या वसुधा जोशी, पर्यवेक्षिका शारदा होशिंग, पर्यावरणदूत डॉ. अमोल बागुल, कलाशिक्षक विवेक भारताल, अरुण राशिनकर व सुनील रायकर उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे