ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

माजी अर्थमंत्री जयंत पाटील थोड्याच दिवसात भाजपात

राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जयंत पाटील भाजपात येणार असल्याचा दावा सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आलाय. यामुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनि‍करणावर चर्चा सुरू असतानाच आता थेट जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे विधान सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आले. या विधानाला जयंत पाटील यांनी खोडून काढलेय.

सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील काही दिवसात भाजपमध्ये येतील, असा दावा केला. ते सांगलीत बोलत होते. जयंत पाटलांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. १० पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार, असे विधान जयंत पाटील यांनी केलेय. सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.

आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्याच दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले होते.

यावर जयंत पाटील यांनी प्रति उत्तर दिले आहे. दहा पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजप मध्ये जाणार, असे जयंत पाटील म्हणाले.

आता काटा उलटा फिरायला लागलाय, लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत..थोडया दिवसात ते भाजपात येतील, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या बाबतीत केले.

भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे, कारण सत्ते विना ते बाळ जगू शकत नाही.. कधी उडी मारायचे, ते बघायला लागले आहे.. असा टोला देखील जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावला आहे..

सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. १० पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आहे.. आणि मला म्हणतोय भाजपमध्ये जाणार, असे म्हणत जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे