ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आरटीओ साहेबांनी जुनी मनपा येथील कामगार तुरुंग गर्दी हलवावी – सुनिता चौहाण महिला आघाडी

अहिल्यानगर

शाळेच्या विद्यार्थ्यांना करावा लागतो दुर्घटनेचा सामना – शिव राष्ट्र सेना..

शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने जुनी मनपा या ठिकाणी महिला आघाडी कडून पाहणी करण्यात आली. यादरम्यान बहुतांशी पालकांनी व नागरिकांनी तक्रारी केल्या की पूर्वी तुरुंग स्वामी विवेकानंद या चौकामध्ये कामगार उभे राहायचे परंतु आता या शंभर दीडशे कामगारांचा थांबा जुनी मनपा या ठिकाणी चौकामध्ये थांबत आहे. यामुळे संपूर्ण ट्राफिक ही अडथळा ठरत आहे.

तसेच कामगाराला घेऊन जाणारे फोर व्हीलर मध्येच रस्त्यामध्ये उभा राहून संपूर्ण गर्दी आडवतात. यादरम्यान शाळेला जाणारे विद्यार्थी यांना यापासून गर्दीचा व दुर्घटनेचा सामना करावा लागतो.

तरी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने महिला आघाडी यांच्याकडून आरटीओ साहेबांना सांगण्यात येते की, हा थांबा न हलवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे