ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल देऊ आमिष दाखवत नागरिकांना घातला गंडा

अहमदनगर प्रतिनिधी

सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल्स पुरविण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर हॉटेल्स उपलब्ध करुन न देता नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी ए.आर. हॉलिडेज कंपनीचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या कंपनीचे वसई येथे मुख्यालय आहे. या कंपनीने २०२२ मध्ये नगर शहरात विविध हॉटेलमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमध्ये नागरिक उपस्थित राहिले, तर त्यांना एका सहलीसाठी मोफत हॉटेल्स दिले जाईल, असे फोनवर सांगितले गेले. त्यामुळे अनेक नागरिक सेमिनारमध्ये गेले.

सेमिनारमध्ये ‘आमच्या कंपनीत पुढील पाच वर्षांसाठी दीड लाख रुपये गुंतविल्यास तुम्हाला दरवर्षी सहा रात्र आणि सात दिवसांसाठी भारतात तसेच आशियाई राष्ट्रांत फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्सची सुविधा दिली जाईल’, असे सांगितले गेले. त्याचवेळी अनेक नागरिकांकडून ही रक्कम ऑनलाईन अथवा रोख स्वरुपात घेतली गेली.

काही नागरिकांकडून पॅकेजनुसार वेगळे पैसे घेतले गेले. पैसे भरल्यानंतर गुंतवणूकदारांना तसे पत्र पाठविले गेले. तसेच सेमिनारला उपस्थित राहिल्याबद्दल एका सहलीसाठी हॉटेल पुरविण्याचे फ्री हॉऊचर दिले गेले.

त्यानंतर मागणी केल्यानंतरही गुंतवणूकदारांना हॉटेल्स मात्र उपलब्ध करुन देण्यात आले नाही. गुंतवणुकदारांनी फोन तसेच मेलवर कंपनीशी वारंवार संपर्क केल्यानंतरही कंपनीने दखल घेतली नाही. याऊलट गुंतवणूकदारांकडे वर्षाअखेर १ हजार ९९९ रुपयांचा युटिलिटी चार्ज मागितला गेला. हे चार्जेस भरले तरच हॉटेलचे बुकिंग मिळेल, असे सांगितले गेले. कंपनीच्या वतीने सरफराज, स्वप्नील साळे यांसह विविध लोकांनी सेमिनारमध्ये सादरीकरण केले.

मात्र, त्यांनीही गुंतवणूकदारांना नंतर काहीही मदत केली नाही. गुंतवणुकदारांना कंपनीचे मालक अमित राणा, वृंदा, सुवर्णा भोगल या कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितला. मात्र, त्यांनीही काहीही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या कंपनीचे कार्यकारी संचालक अमित राणा, सरफराज, स्वप्नील साळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सुजाता लंके, अंजली देशमुख, राजेंद्र घोडके या नगरमधील नागरिकांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात राज्यभर अनेक गुंतवणूकदार असण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे