ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ताज हॉटेल उडवणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन

मुंबई

इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे सर्व देशाचे लक्ष मुंबईकडे लागलेले असतानाच मुंबईची शान असणारे ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कालच (31 ऑगस्ट) मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन आल्याने खळबळ उडाली होती. आता दुसऱ्याच दिवशी मुंबई पोलिसांना पुन्हा बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन आला आहे.

सागरी मार्गाने भारतात येऊ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी धमकीचा हा निनावी फोन आला. दोन पाकिस्तानी नागरिक ताज हॉटेल उडवून देण्यासाठी मुंबईत पोहोचतील. सागरी मार्गाने हे पाकिस्तानी नागरिक भारताच्या हद्दीत प्रवेश करतील आणि ताज हॉटेल उडवून देतील अशी धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्याने आपले नाव मुकेश सिंग असे सांगितले. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा फोन आला.

सांताक्रूझ येथून फोन

दरम्यान, धमकीचा फोन येताच पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासामध्ये हा फोन सांताक्रूझ येथून आल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीने हा फोन केला आहे. अधिक तपास करत पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मंत्रालयही उडवण्याची धमकी

दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी आताच बोलणे करून द्या, नाही तर मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन गुरुवारी मुंबई पोलिसांना आला होता. त्यामुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी फोन करणाऱ्याला शोधून काढले असून तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, त्यांच्याशी बोलणे न झाल्याने त्याने धमकी देणारा फोन केला. दुसरीकडे, याचदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामासाठी स्फोट करताना मंत्रालयावर दगडांचा अक्षरश: वर्षाव झाला. त्यामुळेही चांगलाच गोंधळ उडाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंत्रालयात चाकू नेणारा उमरग्याचा तरुण ताब्यात

मंत्रालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षा गेटवर एकाला ताब्यात घेण्यात आले. बॅग स्कॅन करताना त्याच्याकडे धारदार चाकू सापडला. संबंधित तरुण उमरगा येथील रहिवासी आहे. त्याने चाकू नेमका कशासाठी आणला होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे