ब्रेकिंग
उत्तर भारतात थंडीची चाहूल, महाराष्ट्रात मात्र प्रचंड उकाडा

यंदाच्या मान्सूनचा मुक्काम ठरलेल्या दिवसांत संपला आणि पाहता पाहता राज्यासह देशातूनही मान्सून माघारी फिरला.
परतीच्या पावसाचा प्रवास आता अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचताना दिसत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा दाह आणखी वाढला. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांनंतर राज्यात October Heat चं प्रमाण आणखी वाढणार आहे. थोडक्यात तापमानवाढ होणार असल्यामुळं नागरिकांना मोठ्या हवामान बदलांना सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस हा दाह कमी होताना दिसेल.
बुधवारपासून कोकण, मुंबई, नवी मुंबई, पालघर, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये उकाडा नागरिकांना हैराण करेल, तर सातारा, कोल्हापुरात पहाटेच्या वेळी तापमानाच काहीशी घट नोंदवली जाणार आहे. राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्येही संध्याकाळच्या वेळी काही अंशांची घट नोंदवण्यात येईल.