ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

नगर जिल्ह्यातील ७० प्राथमिक शाळांना मिळाले ग्रंथालय. रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचा पुढाकार

अहमदनगर प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या पुढाकारातून अहमदनगर जिल्ह्यातील ७० प्राथमिक शाळांना ग्रंथालय वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शाळेला लोखंडी कपाटासह ६५ पुस्तकांचा संच व फळझाडांच्या बियांची बँक देण्यात आली. या उपक्रमामुळे वाचन संस्कृती वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

वृंदावन लॉन येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ प्राथमिक शाळा व नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील खासगी प्राथमिक १७ शाळांनाही या उपक्रमातून लाभ देण्यात आला. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अभियानाला ४ लाख २० हजारांचा हातभार लागला आहे. सप्टेंबर अखेर २ लाख २८ हजार रूपयांचे ग्रंथालये साहित्य उपलब्ध होणार आहे.

रोटरी क्लब मार्फत यावर्षी साक्षरता उपक्रमांतर्गत एकूण १०८ शाळांमध्ये ग्रंथालयाची सुविधा देण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ३८ शाळांमध्ये सप्टेंबर महिना अखेर ग्रंथालयासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टच फाउंडेशन मार्फत फळझाडांच्या बीयांची बँक उपलब्ध करून देण्यात आली. मधुरा झावरे यांनी प्रास्ताविक केले. रोटरी क्लबच्या डी. जी. स्वाती हेरकल तसेच पद्मश्री नीलिमा मिश्रा या उपस्थित होत्या.

सदरचा कार्यक्रम शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण जयश्री कार्ले, जिल्हा साक्षरता संचालक दादासाहेब करंजुले, रोटरी क्लब ऑफ मिडटावूनच्या अध्यक्षा मधुरा झावरे, सचिव अमोल खोले, ओबेराय, पारेख आदी उपस्थित होते. साक्षरता उपक्रमाचे प्रकल्प सचिव हेमंत कराळे व साक्षरता उपक्रमाचे संचालक डॉ. प्रसाद उबाळे, क्षितिज झावरे यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे