ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगार च्या वतीने श्रीनिवास बोज्जा यांचा सन्मान 

अहमदनगर प्रतिनिधी

प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल चे संस्थापक श्रीनिवास बोज्जा साहेब यांना आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत, दिल्ली सरकारच्या ओबिसी आयोगाकडून ” राष्ट्रीय एकता पुरस्कार” भारताची राजधानी दिल्लीतील कॉस्टिस्टुशन क्लब मध्ये देण्यात आला म्हणून  माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगार अहमदनगर यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी गुंड साहेब याचे हस्ते शाल ,फेटा ,हार, श्रीफळ देऊन त्यांचा संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय वाघ, कार्याध्यक्ष संजू ढाकणे, सचिव कॅप्टन शेख सिकंदर खजिनदार फरताडे बापू सह खजिनदार कुंडलिक ढाकणे संस्थेचे नवीन मेंबर पोपट दहिफळे आदी उपस्थित होते.

या वेळी प्रस्तविक मेजर कुंडलिक ढाकणे यांनो करतांना श्रीनिवास बोज्जा यांच्या बाबत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष रामदास गुंड यांनी संस्थे बाबत माहिती देऊन चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी संस्था असून बोज्जा यांचे कार्य अलोकिक असल्यामुळेच त्यांना दिल्ली चा पुरस्कार मिळाला.

या वेळी सत्काराला उत्तर देतांना बोज्जा म्हणाले मला नेहमीच सैनिकांचा अभिमान आहे. माजी सैनिकांनी केलेला सन्मान हा माझ्यासाठी फार महत्वाचं असून मी आपल्या संस्थेसाठी सर्वतोपारी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन शेख सिकंदर यांनी केले तर आभार संजय वाघ यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे