ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

अहिल्यानगर

राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी, गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

ही सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार आहे.

सदर अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालयांसह निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांनाही लागू होणार आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे