ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात दौलावडगावात देशभक्तीबरोबरच गुणवत्तेलाही सलाम-सामाजिक कार्यकर्ते महादेव कोहक यांच्या आवाहनाला विद्यार्थिनी आश्मीरा शेखची दणदणीत सलामी

दौलावडगाव

सरस्वती विद्यालयात १५ ऑगस्टनिमित्त आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.

मात्र, या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते सामाजिक कार्यकर्ते महादेव सर्जेराव कोहक यांनी दिलेले रेंजर सायकल बक्षीस.

केंद्रीय जिल्हा परिषद शाळा, दौलावडगाव येथील कु. आश्मीरा मोसीम शेख हिने मंथन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली. तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत महादेव कोहक यांच्या पुढाकारातून तिला रेसर सायकल व ट्रॉफी देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही त्यांना प्रोत्साहनाची गरज असते, ही बाब लक्षात घेऊन कोहक यांनी गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना एक अनोखे आवाहन केले होते.

‘मेहनत करा, चांगले गुण मिळवा, गुणवंत विद्यार्थ्याला रेसर सायकल बक्षीस दिले जाईल,’ असा शब्द त्यांनी दिला होता. अनेकदा घोषणा होतात आणि त्या विस्मरणात जातात.. मात्र कोहक यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवत विद्यार्थिनीच्या हातात बक्षिसाची सायकल सोपवली.त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची दौलावडगावात विशेष चर्चा रंगली.

एका सायकलीचे हे बक्षीस केवळ वस्तू नसून ‘मेहनत केली तर यश मिळते’ हा संदेश देणारी प्रेरणा ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात स्पर्धात्मक भावना निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या कर्तृत्वाची नवी उंची गाठता यावी, या उद्देशाने कोहक यांनी हा उपक्रम राबविला.

यावेळी सरस्वती विद्यालयातील आणि केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमास विद्देमान सरपंच, उपसरपंच माजी सभापती, ग्राम पंचायत सदस्य, से. सो. चेयरमण, त्रिदल सैनिक संघटणेतील पदाधिकारी, प्राचर्य, मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन, मेहनतीला बक्षीस आणि यशाला सलाम करणारी भुमिका सामाजिक कार्यकर्ते महादेव कोहक यांच्या या उपक्रमाने स्वातंत्र्यदिनाचा सोहळा खऱ्या अथनि प्रेरणादायी ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे