ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जागतिक महिला दिन निमित्त राजमाता जिजाऊ व जनकल्याण रत्न 2026 पुरस्कार सन्मान सोहळा

ठाणे

 रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने 100 महिला यांचा राजमाता जिजाऊ सन्मान 2026 व पाठीशी उभे राहणारे पुरुष वर्ग यांना जनकल्याण रत्न सन्मान 2026 प्रदान करण्यात आला..

संपूर्ण महाराष्ट्र मधून ठाणे येथे या उपक्रम मध्ये कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक राजकीय संसकृतिक, साहित्यिक, उद्योजक, पत्रकार बांधव उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन प्रमुख उपस्थित मान्यवर श्री सचिन फळणे,सौ स्वाती हिरवे, श्री रणधीर सकपाळ, श्री विजय फळणे, सो अंकिता मालवदे, श्री निलेश अहिरे श्री गंगाराम पार्टे सौ सीमा पुकाळे यांच्या वतीने व सौ शुभांगी राऊत, सौ सायली मांजरेकर,सौ वर्षा शिंदे,सौ मीरा पाटील यांच्या हस्ते शाळ, श्री फळ, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह फ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला..

आपला हा सन्मान म्हणजेच एक आपल्या कार्यात जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे हे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने येणारे वार्षिक उपक्रम व योजना आपल्या विभागात राबवण्याचे व महिला सक्ष्मीकरण करण्याचे व शिका व कमवा संपूर्ण महाराष्ट्र भर राबवणारे अभियान घरोघरी पोहचवण्याचे काम प्रत्येक महिलेने घेतले आहे..

छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ व शंभु राजे प्रतिमा पुजन करून मान्यवर स्वागत व सत्कार करण्यात आला.शिवजयंती घरघरात शिवराय मनामनात हा विचार करून रोज घरी पुजन करण्यासाठी प्रतिमा भेट देण्यात आली.
महिलांचा सन्मान केल्याबदल श्री रेश्मा निलेश अहिरे यांच्या वतीने आभार प्रदर्शन मांडण्यात आले..मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच पोलीस तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला..
संपूर्ण महाराष्ट्र मधून आपला अमूल्य वेळ काढुन आल्याबद्दल सर्व जिजाऊ लेकी चे जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने संस्थापक श्री सचिन फळणे यांच्या वतीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रम सांगता झाली.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे