अहिल्यानगर येथील शमी गणपती मंगल कार्यालय येथे 3,4 व 5 जुलै रोजी “अमृत पेठ-थेट बाजार पेठ” चे आयोजन
महिला उद्योजक व छोटे उद्योजकांचे विक्री व ब्रँडिंग व प्रचारासाठी अशा प्रदर्शनाची गरज असल्याचे मत उदघाटन प्रसंगी महापौर ज्योतीताई गाडे यांनी व्यक्त केले.

महापौर सौ.ज्योतिताई अमोल गाडे यांच्या हस्ते आज उदघाटन पार पडले.
अहिल्यानगर मधील ही फक्त बाजारपेठ नाही. ही आपल्या मातीतले कष्टकरी हातांना आधार देणारी चळवळ आहे.ही स्वदेशी वस्तूंचा प्रोत्साहन देणारी अभिमानाची संधी आहे.
उद्योजक महिला बचत गट शेतकरी आणि तरुणांसाठी नवीन दिशा आहे. आवडीच्या वस्तू,गुणवत्ता आणि रास्त दर आता एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आले आहे. या पबाजार पेठ मधून महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच महिला उद्योजकांसाठी एक व्यासपीठ निर्माण झाले आहे.
महिला उद्योजक व छोटे उद्योजकांचे विक्री व ब्रँडिंग व प्रचारासाठी प्रदर्शनाची गरज आहे.असे प्रतिपादन महानगरपालिकेचे महापौर सौ. ज्योतीताई गाडे यांनी केले आहे.
अमृत (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व प्रतिबिंब संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शमी गणपती हॉल,दिल्लीगेट, अहिल्यानगर येथे अमृत पेठ -थेट बाजारपेठ चे उद्घाटन महापौर सौं ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर मा.धनंजय जाधव हे ही आवर्जून उपस्थित होते.
त्याच बरोबर मर्चंट बँकेचे चेअरमन संजय चोपडा,माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी,शमी गणपती मंदिर अध्यक्ष विनायक देशमुख,अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे,अमृत मित्र वैभव कुलकर्णी,संयोजिका अनुजा कांबळे,वनिता मानकर,जयश्री सूळ,ऋतुजा धोत्रे,प्रिया भागवत, मीनाक्षी कुलकर्णी, भरती घोलप आदिंसह महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमहापौर मा.धनंजय जाधव म्हणाले, या प्रदर्शन व मेळाव्यातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.तसेच महिलांना उद्योग व्यवसायासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.नगरकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी.
प्रतिबिंब संस्थेच्या सौ.अनुजा कांबळे म्हणाले,या प्रदर्शना मध्ये कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, किड्स वेअर, फूड स्टॉल, आयुर्वेद, उन्हाळी वाळवण,गृहपयोगी वस्तू आदींचे स्टॉल उपलब्ध आहेत.स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दर्जेदार व स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी “महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृतपेठ-थेट बाजारपेठ’ हा विशेष उपक्रम राबवला जातो.
अहिल्यानगर मध्ये मार्च व में महिन्यात भरलेल्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.त्यामुळे आता पुन्हा एकदा या उपक्रमाचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले असून, 3,4 व 5 जुलै 2026 रोजी बचत गटांचे प्रदर्शन व विक्री ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे.नगरकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन उद्योजकांचा उत्साह वाढवावा.
अमृत संस्थे चे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे म्हणाले,अमृत संस्था-अहिल्यानगर व प्रतिबिंब संस्था-अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वदेशी आणि दर्जेदार उत्पादने हे अमृतपेठ चे वैशिष्ट्य असून,ग्राहक आणि उत्पादक अशा दोघांसाठीही हा उपक्रम फायद्याचा ठरतो.नगरकरांनी कुटुंबासह भेट देऊन खरेदि करावी असे आवाहन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ऋतुजा धोत्रे यांनी केले तर आभार नक्षत्रा कांबळे यांनी मानले.
ठिकाण :-शमी गणपती मंदिर हॉल, दिल्लीगेट, अहिल्यानगर -414003
अमृत संस्थेविषयी – महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे.
त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769
जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर – 414003




