ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची ८४.५३ लाखांची फसवणूक

अहिल्यानगर  मधील जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप आणि परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने जामखेड येथील एका व्यावसायिकाची तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील बीड रोडवरील रामेश्वर एजन्सीचे मालक आणि कृषी सेवा केंद्र चालक उदय गुलाबराव शिंदे (वय ५४) यांना सौरभ अग्रवाल (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) याने संपर्क साधला होता.

सौरभ याने शिंदे यांना जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप आणि त्याचा परवाना मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२५ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत प्रोसेसिंग फी आणि इतर विविध कारणांखाली शिंदे यांच्याकडून वेळोवेळी एकूण ८४ लाख ५३ हजार रुपये उकळले. मात्र नंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क तोडला.

पैसे देऊनही डीलरशिप न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी १५ जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत सौरभ अग्रवाल (मो.नं. ८३८२०१११८४), शिंदे इंजिनिअर (मो.नं. ८३१८५९१७६७) आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध फिर्याद दिली. शिंदे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी या आरोपींच्या विरुद्ध भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३२९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढिकले करत आहेत.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे