
नगर येथील प्रसिध्द श्री दत्त देवस्थान (वेदांत नगर) या ठिकाणी 1993 ते 1995 दरम्यान चार वेळा आशा भोसले यांनी हजेरी लावली होती. यात दोन वेळा त्या गायन सेवेसाठी तर दोन वेळा श्री दत्त व रामकृष्ण महाराज यांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवस्थानच्यावतीने याबाबत माहिती देण्यात आली.
नगर येथील प्रसिध्द श्री दत्त देवस्थान (वेदांत नगर) या ठिकाणी 1993 या ठिकाणी रामकृष्ण महाराज यांच्या साठ वर्षपूर्तीबद्दल रौप्यतुला कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या उत्सावादरम्यान 1993 ला संपूर्ण मंगेशकर कुटूंबातील सदस्यांनी नगरला भेट दिली होती. यात आशा भोसले देखील उपस्थित होत्या. त्यांनी उत्सवादरम्यान अमृताचा धनु कार्यक्रमात ज्ञानेश्वरांचा अंभग गात उपस्थितांना चार तासांहून अधिक काळ मंत्रमुग्ध केले होते. यावेळी देवस्थानच्यावतीने आशा भोसले यांचा सन्मान करण्यात आला होता.
रविवारी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त येताच नगरच्या संगित विश्वाला धक्का बसला. दम्यान, दिवंगत भोसले यांच्या अहिल्यानगरच्या अखेरच्या भेटीचा शोध घेण्यात येत असतांना सुमारे 31 वर्षापूर्वी भोसले यांनी नगरला चार वेळा भेट दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली.
नगर येथील प्रसिध्द श्री दत्त देवस्थान (वेदांत नगर) या ठिकाणी रामकृष्ण महाराज यांच्या रौप्यतुला कार्यक्रमानिमित्त आयोजित उत्सवात अमृताचा धनु कार्यक्रमात दिवंगत आशा भोसले यांनी ज्ञानेश्वरांचा अंभग गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. यावेळी हृदयनाथ मंगेशकर, पत्नी राधा मंगेशकर आणि भोसले यांचा सन्मान देवस्थान यांच्यावतीने करण्यात आला होता. हा प्रसंग 22 नोव्हेंबर 1993 चा होता.
दरम्यान, देवस्थानला ज्येष्ठ गायिक लता मंगेशकर यांनी देखील भेट दिली होती. त्यांचाही देवस्थानच्यावतीने साडी- चोळी देवून सन्मान करण्यात आला होता.
याबाबतीची माहिती देवस्थानचे गुरुदेवांचे ज्येष्ठ भक्त मंदाताई जोशी यांच्याकडे उपलब्ध असल्याचे देवस्थानचे विश्वास अॅड. मिलींद क्षीरसागर यांनी सांगित तसेच रामकृष्ण महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावत त्यावेळी गायनसेवा दिली होती. तसेच 1993 ते 95 या कालावधीत दोनवेळा आशा भोसले या नगरला दर्शनासाठी आल्या होत्या.
बिस्मिल्लाखान यांनाही केले होते निमंत्रित
नगरच्या दत्त देवस्थानाच्यावतीने दाते घराण्यात शंभर वर्षे अचूक पंचाग तयार केले म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रख्यात सनई वादक बिस्मिल्ला खान यांनी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ते उपलब्ध झाले नाही. मात्र, मंगेशकर कुटूंबाने या वेळी नगरला हजेरी लावली होती. यावेळी आशा भोसले देखील हजर होत्या.
भोसले आणि महाराजांची विशेष भेट
1999 मध्ये श्री दत्त देवस्थानचे गुरूदेव आजारपणात उपचार घेण्यासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्यांच्या जवळच्या मजल्यावर प्रसिध्द नायक कमल हसन यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी भोसले लिलावतीमध्ये आल्या होत्या. यावेळी महाराजांचे यांचे भक्त यांनी भोसले यांना नगरचे महाराजांवर लिलावतीमध्ये उपचार सुरू असल्याचा निरोप दिल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आधी महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर कमल हसन यांच्या पत्नीच्या भेटीला त्या गेल्या.
याबाबतची माहिती नगरमधील सहकार सभागृहात खुद्द हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली असल्याची माहिती श्री देवस्थानचे सेवेकरी राजेंद्र थोरे यांनी दिली.



