ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात दोन चिमुकल्यांना आमिष दाखवून छेडछाड, नराधमाला नागरिकांनी पकडले..

अहिल्यानगर

​अहिल्यानगर शहरातील आनंदीबाजार परिसरात दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमाला नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. अमित सुभाष गवळी (वय २२, रा. विजयनगर, बोल्हेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश गाली यांची ७ वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजाऱ्यांची ८ वर्षांची मुलगी सोमवारी सकाळी घरासमोर खेळत होत्या.

यावेळी एका दुकानाच्या पायरीवर बसलेल्या अमित गवळी याने दोन्ही चिमुकल्यांना हाका मारून जवळ बोलावले. “मी तुम्हाला चॉकलेट आणि पैसे देतो,” असे आमिष दाखवून त्याने मुलींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलींनी तातडीने घरात धाव घेऊन पालकांना हा प्रकार सांगितला.

​फिर्यादींनी बाहेर येऊन पाहिले असता आरोपी तेथेच बसलेला दिसला. त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी आणि इतर नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव निष्पन्न झाले.

अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने हातवारे करून आमिष दाखवल्याप्रकरणी अमित गवळीविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड करत आहेत. चिमुकल्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे