ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर पुणे एस पी ऑफीस चौक ते जी.पी.ओ. चौक शनिवारी वाहतुकीत बदल

अहिल्यानगर – पुणे या मार्गावरील एस.पी.ओ.चौक ते जी.पी.ओ. चौक या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुक मार्गात बदल केलेबाबत.

दि. २१/०३/२०२६ रोजी ( चंद्रदर्शनानुसार एक दिवस पुढे मागे) या दिवशी मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सण असल्याने कोठला ईदगाह मैदान या ठिकाणी नमाज पठण करण्यात येणार आहे.

मैदान हे अहिल्यानगर – पुणे महामार्गालगत आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाज हॉर्न यामुळे नमाज पठणात व्यत्यय येतो. तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या करीता सदर मार्गात खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.

त्याकरीता दि. २१/०३/२०२६ रोजी (चंद्र दर्शनानुसार एक दिवस पुढे मागे ) सकाळी ०८.०० ते दुपारी १२.००वाजेपर्यंत अहिल्यानगर – पुणे या मार्गावरील एस.पी.ओ.चौक ते जी.पी.ओ.चौक या रोडवरील येणारी वजाणारी सर्व प्रकारची चारचाकी व जड वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

१) संभाजीनगर रोड तसेच मनमाड रोड कडुन येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग-

> एस.पी.ओ.चौक न्यायनगर मार्गे – बेलेश्वर चौक किल्ला चौक जी.पी.ओ. चौक – चांदणी

चौक मार्गे इच्छित स्थळी

२) सोलापुर रोड, जामखेड रोड तसेच पुणे रोडकडुन येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग-

> जी.पी.ओ.चौक – बेलेश्वर चौक न्यायनगर एस.पी.ओ.चौक मार्गे इच्छितस्थळी

३) पुणे रोडकडुन उड्डाणपुलाचा वापर करुन येणारे वाहनांकरीता पार्यायी मार्ग – चांदणी चौक येथे उतरणारे उड्डाणपुल मार्गाचा वार करुन चांदणी चौक जी पी ओ चौक- बेलेश्वर

चौक – न्यायनगर एस.पी.ओ.चौक मार्गे इच्छित स्थळी

प्रस्तुत आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्या करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक, अहिलयानगर यांनी अवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक..

शहर वाहतुक नियंत्रण शाखा..

अहिल्यानगर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे