ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात अश्लील कृत्ये.. 11 महिलांवर कारवाई

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणार्‍या नागरिकांकडे अश्लील हावभाव करणे व अश्लील गाणी म्हणत सार्वजनिक वातावरण दूषित केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 11 महिलांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (10 फेब्रुवारी) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार शहरात गस्त सुरू होते.

दरम्यान, माळीवाडा बसस्थानक परिसरात काही महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांकडे अश्लील हावभाव करत असल्याची व अश्लील गाणी म्हणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी धाव घेत खात्री केली असता काही महिला अश्लील कृत्य करताना आढळून आल्या.

पोलिसांनी घटनास्थळीच 11 महिलांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात महिला सहायक निरीक्षक तेजश्री थोरात, महिला उपनिरीक्षक शितल मुगडे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार संतोष बनकर, विशाल दळवी, विनोद बोरगे, विजय ठोंबरे, पल्लवी रोहेकले, वर्षा पंडित, दिख्खत, अभय कदम, दीपक रोहकले, दत्तात्रय कोतकर, सुरज कदम, सत्यम शिंदे, रमेश शिंदे व सोमनाथ राऊत यांचा समावेश होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे