ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार संग्राम जगतापांनी घेतली पत्रकार परिषद..

अहिल्यानगर

धीरज परदेशीवरील हल्ल्याच्या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. धीरज परदेशी याची हत्या टिळा लावल्यामुळे झाल्याचा आरोप भाजपं आमदार संग्राम जगताप यांनी केला. आज त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या.

“या घटनेसंदर्भात कागदपत्र तयार होण्याआधीपासून चांगला सरकारी वकिल पाहिजे. ही घटना वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलीस प्रयत्न करतायत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करणार आहोत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत.आमच्या मागण्या मांडणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या” असं संग्राम जगताप म्हणाले. “त्याच्यानंतर कालपासून वेगवेगळ्या घटना घडत आहेत. आंदोलन अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा भूमिका बदलण्याचं काम केलं. म्हणून आज आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली” असं जगताप म्हणाले.

आमची जी मागणी होती त्यांची जी अनधिकृत घर आहेत त्यांना शासनाने नोटीस लावली. पण त्यांनी हायकोर्टात जाऊन स्टे मिळवला. यामागचे जे मास्टरमाइंड आहेत ते वेगळे आहेत. पोलीस कानाडोळा करतायत. दुर्लक्ष करतायाय. त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. धीरज परदेशी यांच्या पत्नीला शासनाच्या माध्यमातून नोकरी मिळाली पाहिजे. आमच्या हिंदुत्ववादी संघटनांकडून मदत दिली जाईल. पण सन्मानजनक नोकरी मिळाली पाहिजे” अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे