ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पाच लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी

पारनेर नवीन म्हसणे फाटा सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये काम चालू ठेवण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्या, नाहीतर हातपाय तोडण्याची धमकी आरोपी राजु पाचारणे यांनी कंपनी कामगारांना दिली आहे.

याबाबत अंजली दत्तान्य येवले (रा. वडझिरे, ता. पारनेर, हल्ली रा. मोशी, पुणे) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, प्रीव्हिलेज एनरजेक्स प्रा. लि., पळवे बुद्रुक शिवार, ता. पारनेर येथे फायर फायटर सिस्टीमचे काम करत असताना आरोपी राजु पाचारणे (रा. पळवे खुर्द) यांनी शिवीगाळ करून धमकी देऊन म्हटले की, कंपनीत काम चालू करायचे असेल तर माझी परवानगी घ्यायची. जर काम चालू केले तर तुमचे कुर्‍हाडीने हातपाय तोडून सर्वांना जिवे ठार मारू अशी धमकी दिली.

त्यावर फिर्यादी व तेथील कामगार सहकारीनी त्यास समजावून सांगत असताना तो फिर्यादीस म्हणाला की, तुला काम करायचे असेल तर मला पाच लाख रुपयेची खंडणी द्यावी लागेल, तरच तुझे काम चालू कर; नाहीतर काम बंद ठेव, असे म्हणून त्याने कंपनीतील चाललेले काम बंद पाडले. आणि मी कोणालाही घाबरत नाही. तुला पाच लाख रुपये द्यावेच लागतील, नाहीतर तुला काय करायचे ते कर असे म्हणत आरोपी तेथून निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुटे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे