ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

आई-वडिलांना मारहाण करून अल्पवयीन मुलीसोबत केले लग्न

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना मारहाण करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले आणि अत्याचार करून गर्भपात करण्यासाठी मारहाण केल्याची धक्कादायक घटना भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पीडित 17 वर्षीय मुलीने शनिवारी (20 डिसेंबर) रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या चौघांमध्ये पती, सासू-सासरे व अन्य दोघांचा समावेश आहे. पती, सासू-सासरे हे नागरदेवळे (ता. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहेत. तर एक जण नालेगाव (अहिल्यानगर) येथील रहिवासी आहे.

सदरची घटना 4 फेब्रुवारी 2025 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान घडली आहे. संशयित आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना मारहाण केली आणि तिला लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर पतीने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यातून ती गर्भवती राहिली.

पीडितेने गर्भधारणेची माहिती दिल्यानंतर, संशयित आरोपीने हे मूल नको असल्याचे सांगून तिला मारहाण केली. तसेच तिला गर्भपात करण्यासाठी धमकावून शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे