ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदान केंद्र असलेल्या शाळांना १९ व २० डिसेंबरला सुट्टी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार १९ डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा (राहाता वगळून) तसेच कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे.

मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजी केंद्रांवर पोहोचणार आहेत. त्यामुळे निवडणूक कामात अडथळा येऊ नये, यासाठी संबंधित शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित मतदान केंद्रे (शाळांच्या इमारती) निवडणूक कामासाठी उपलब्ध राहतील तसेच तेथे पिण्याचे पाणी व वीज व्यवस्था सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे