ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तक्षिला स्कूलमध्ये भव्य “बाल संगम 2025″ बालपणाचा उत्सव” कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर

तक्षिला स्कूलतर्फे बाल संगम 2025 या भव्य बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हा आनंदोत्सव मंगळवार, 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत तक्षिला स्कूल परिसर, जामखेड रोड, आर्मर्ड सेंटरजवळ, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.

बाल संगम 2025 हा मुलांच्या आनंद, सर्जनशीलता आणि कुटुंबीयांमधील नातेसंबंध साजरे करणारा उत्सव असून, मुलांसह पालकांसाठीही तो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. मुलांना सुरक्षित, आनंददायी व सर्जनशील वातावरण उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उत्सवात मुलांसाठी विविध मनोरंजक खेळ, चविष्ट खाद्यपदार्थांचा फूड फेस्टिव्हल, कला व सर्जनशील उपक्रमांचे खास कॉर्नर्स, तसेच आकर्षक बक्षिसांसह मेगा लकी ड्रॉ यांचा समावेश असणार आहे. याशिवाय सरप्राइज सांता एंट्री, कार्टून कॅरेक्टर भेट, तसेच खरेदीसाठी स्टॉल्स व आकर्षक रिवॉर्ड्स ही विशेष आकर्षणे उपस्थितांना अनुभवता येणार आहेत.

बाल संगम 2025 हा कार्यक्रम सर्व मुलांसाठी व कुटुंबांसाठी खुला असून, तक्षिला स्कूलतर्फे सर्व नागरिकांना या आनंदोत्सवात सहभागी होण्याचे मनःपूर्वक आवाहन करण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे