ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नायलॉन मांजा खरेदी, विक्री, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व चायनीज मांजाच्या विक्री विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून, शास्त्रीनगर परिसरात कोतवाली पोलिसांनी ‘नायलॉन मांजा’ खरेदी, विक्री सेंटरवर छापा टाकला.

या कारवाईत ९० हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सूरज दिलीप कदम यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी एकनाथ अशोक वीरकर (वय ३५ वर्षे, रा. शास्त्रीनगर, अहिल्यानगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी शास्त्रीनगर, केडगाव परिसरात वरील आरोपी ‘नायलॉन मांजा’ ची विक्री करतांना आढळला.

त्याचे ताब्यात बंदी घातलेला ‘मोनो केटीसी’ आणि ‘हिरो प्लस’ या नावाच्या नायलॉन मांजाचे बंडल पोलिसांनी जप्त केले. ​हा मांजा प्लास्टिक किंवा कृत्रिम पक्क्या धाग्याने बनलेला असून, महाराष्ट्र शासनाच्या सूचनांचे व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे सरळ उल्लंघन करत होता. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली ​पोलिस करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे