ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन समाजकंटक हद्दपार

अहिल्यानगर

​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सूत्रे हाती घेताच मोठी कारवा​काका ऊर्फ अब्दुलहक फकीर मोहंमद कुरेशी, रा. झेंडीगेट, अहिल्यानगर फैजान इद्रिस कुरेशी, ( रा. झेंडीगेट, जि. ता. अहिल्यानगर), ​म्हम्या ऊर्फ संदिप शरद शिंदे, ( रा. तय्यब मशीद मागे, जि. ता. अहिल्यानगर ) भगवान चाळ ( रा. भोसले आखाडा, जि. ता. अहिल्यानगर ) यांच्याविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. ​

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यामार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सादर करण्यात आला. त्यावर सुनावणी होऊन मा. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांनी वरील तिन्ही व्यक्तींना सहा महिन्यांकरिता जिल्हयातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. सदरच्या कारवाईसाठी ​पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, आणि त्यांच्या पथकातील महिला पोलीस हवालदार शिल्पा कांबळे, पोलीस हवालदार विशाल दळवी, विनोद बोरगे, बाळासाहेव दौंड, वसीम पठाण, साबीर शेख, पोलीस नाईक विजय ठोंबरे, तसेच पोलीस अंमलदार सुरज कदम, सत्यम शिंदे, राम हंडाळ, दिपक रोहकले, सचिन लोळगे, रिंकु काजळे, व महिला पोलीस अंमलदार शिला ढेरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे