ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गुगल मॅप’वर शोधायचे लोकेशन अन् फोडायचे सब स्टेशन, अहिल्यानगर एलसीबीकडून आंतरराज्यीय टोळी जेरबंद

अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या कॉपर चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यिय टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ‘गुगल मॅप’वर एमएसईबी सब-स्टेशनची लोकेशन्स शोधून योजनाबध्द पध्दतीने कॉपर चोरी करणार्‍या या टोळीचा भांडाफोड करण्यात आला असून 4 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बबलू उर्फ हुसेन रेहमत खान (वय 38), समीम कमरअली खान (वय 32, दोघे, रा. विदीशा, मध्यप्रदेश), शकील लईस खान (वय 32, रा. भोपाळ, मध्यप्रदेश), कासीम इदरीस खान (वय 30, रा. सिरोज, विदीशा, मध्यप्रदेश) व शाहरूख साबीर खान (वय 23, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) अशी जेरबंद केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 4 नोव्हेंबर 2025 रोजी 132 के.व्ही. उपकेंद्र खांडके, पिंपळगाव लांडगा (ता. अहिल्यानगर) येथून कॉपर पाईप व बेल्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद अरविंद एकनाथ बडे (वय 53, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला.

त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली कार (एमएच 13 टीए 4320), चोरीस गेलेले एक लाख 40 हजाराचे कॉपर पोल असा एकुण चार लाख 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील संशयित आरोपींना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.हे संशयित आरोपी खास कॉपर चोरीच्या उद्देशानेच महाराष्ट्रात येत असल्याचेही समोर आले.

या टोळीने अहिल्यानगर तालुक्यातील खांडके, 220 के. व्ही. कौडगाव, तसेच जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, सिन्नर (नाशिक ग्रामीण), पारगाव (पुणे ग्रामीण) येथील सब-स्टेशन्स फोडून कॉपर चोरी केल्याची कबूली दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे