ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भाजपाचा पहिला विजय, निवडणुकीआधीच फडकवला विजयाचा झेंडा

सोलापूरच्या अनगर पंचायतीत भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात येत आहे.माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे. हा या निवडणुकीतील भाजपचा पहिला विजय आहे.

भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वखालील पॅनलचे 17 अर्ज दाखल झाले आहेत, मात्र विरोधी बाजून एकही अर्ज न आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.17 सदस्यांच्या जागासाठी केवळ 17 अर्ज दाखल झाल्याने जवळपास बिनविरोध निवड झाल्याने जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून उज्वला थिटे यांचा थेट सामना होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचा आज सोमवारी सायंकाळी निकाल लागला आहे.

अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपचे सर्व 17 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत. भाजप नेते राजन पाटील यांच्या नेतृत्वात हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. पण या मुदतीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपच्या सर्व 17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे