ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजप नेत्याची निर्घृण हत्या

नागपूर

नागपुरात भाजप नेत्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्याची हत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर नागपुरातील भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे.

नागपुरातील यशोधरा पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांची धारधार शास्त्राने वार करून हत्या करण्यात आली. सचिन साहू असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे.

सचिन साहू हे उत्तर नागपुरातील वॉर्डाचे अध्यक्ष होते. जुन्या पैशांच्या देवाण घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. सचिन यांच्या मुलाचा आज वाढदिवस होता. मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले. वाटतेच कांजी हाऊस परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. सचिन यांचे मारेकरी नेमके कोण होते? त्यांच्या हत्येचे नेमके कारण काय? याचा तपास सुरू आहे.

पोलिसांकडून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही तपासात आरोपीचा मागोवा घेत आहे. या हत्येमागे तीन ते चार जण असल्याचा पोलिसांना संशय आहे. सचिन यांचा गणेशोत्सवादरम्यान काही लोकांशी वाद झाला होता. सचिन यांच्या हत्येमागे त्यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे