ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरातुन सराफ व्यापाऱ्याचे दागिणे घेवुन पसार झालेल्या कारागिरांची टोळी पकडली

अहिल्यानगर शहरातुन सराफ व्यापाऱ्याचे दागिणे घेवुन पसार झालेल्या आरोपीकडुन 51,13,795 रुपये किंमतीचे एकुण 572.75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची पश्चिम बंगाल राज्यामध्ये कारवाई…

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर वय – 32 वर्षे, व्यवसाय – सोनार रा. गायकवाड कॉलनी सावेडी रोड, अहिल्यानगर हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांचे दुकानामध्ये काम करत असलेले इसम नामे 1) दिपनकर माजी 2) सोमीन बेरा 3) सोमनाथ सामंता 4) आन्मेश दुलोई 5) सत्तु बेग 6) स्नेहा बेरा यांनी फिर्यादीचे विश्वास संपादन करुन त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने फिर्यादीचे सोनार दुकानातुन 1,01,05,000/- रुपये किंमतीचे दागीने चोरून घेऊन गेले आहे. सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 987/2025 बीएनएस कलम 316(2), 3(5) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.

मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमुद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, प्रशांत राठोड यांचा समावेश करण्यात आलेला होता.

तपास पथकाने गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढुन आरोपीचे शोध घेत असतांना आरोपी हे अमरागरी जिल्हा हावरा, पश्चिम बंगाल येथे असल्याचे माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ अमरागरी जि. हावरा येथे जावुन आरोपीचे शोध घेवुन आरोपी नामे 1) सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक वय – 33 वर्षे रा. पलाशपाई, थाना-खानाकुल हुगली राज्य पश्चिम बंगाल, 2) दिपनकर आरुण माजी वय – 22 वर्षे रा. भाटेखरी, थाना- जायपुर जि. हावरा राज्य पश्चिम बंगाल, 3) अनिमेश मनोरंजन दोलुई वय- 25 वर्षे रा. सबलसिंगपुर, थाना- खानाकुल, जि. हुगली प.बंगाल, 4) सोमनाथ जगन्नाथ सामंता वय- 30 वर्षे रा. सबलसिंगपुर, थाना- खानाकुल, जि. हुगली प.बंगाल, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.

त्यांना गुन्हा करतेवेळी असलेल्या साथीदारांबाबत विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार 5) संतु बेरा, 6) स्नेहा बेरा यांचेसोबत गुन्हा केल्याचे कळविले. ताब्यातील आरोपींकडे चोरी केलेल्या सोन्याचे दागिणे बाबत विचारपुस करुन आरोपी नामे सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक, अनिमेश मनोरंजन दोलुई व दिपनकर आरुण माजी यांचेकडुन एकुण 51,13,795/- रुपये किमतीचे, 572.75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आले आहेत.

गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 987/2025 बीएनएस कलम 316(2), 3(5) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे