ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिल्लीगेट परिसरात राडा दुचाकी फोडल्या, तरुणांना घेरलं,

अहिल्यानगर

पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री घडली. अभिजित संतोष साठे आणि त्याच्या मित्र समद अन्सार शेख यांना चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर त्यांच्या मोपेडची तोडफोड करून घराजवळ दहशत माजवली.

याप्रकरणी फिर्यादी अभिजित साठे यांनी तक्रारी दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सार्थक ठोंबरे, आर्यन अकोलकर व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपींनी १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मोपेडवरून दिल्लीगेट वेशीसमोर जात असलेल्या अभिजित व समदला बोलावून घेतले.

चौघांनी अभिजितच्या मोपेडची चावी काढून, शिवीगाळ करत हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेच आरोपी त्याच्या परिसरात पोहोचले. त्यांनी प्रथम समदच्या घराजवळ उभ्या असलेल्या दोन एक्सेस मोपेडची कोयत्याने तोडफोड केली व समदच्या कुटुंबीयांना धमकावले.

नंतर अभिजितच्या घराजवळ येऊन दरवाज्यावर दगडे मारली, शिवीगाळ केली आणि त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे