ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर तालुक्यात दोन गटात राडा, लोखंडी गज,काठीने मारहाण

अहिल्यानगर

नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या वादातून राडा झाला. याप्रकणी दोन्ही गटांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रर नोंदवली आहे.

निलेश बाळासाहेब शिंदे (वय ३१, रा. अरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादित फिर्यादी व त्यांचा भाऊ नितीन हे रविवारी (दि. ९) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात काम करत होते. यावेळी आरोपींनी बांधावर टाकलेले गवत फिर्यादीच्या शेतात परत फेकले.

शेताच्या बांधावर टाकलेले गवत परत शेतात का टाकले, एवढ्या क्षुल्लक कारणाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील तिघा आरोपींनी फिर्यादी, त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना बेदम मारहाण केल्याचे नमूद केले आहे.

त्यानुसार पोलिसांनी संपत बापु शिंदे, संभाजी संपत शिंदे, आणि अंबादास संपत शिंदे (सर्व रा. शिंदे मळा, अरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर विरोधी फिर्याद संभाजी संपत शिंदे (वय ३१, रा. अरणगाव) यांनी दिली. फिर्यादी यांचे वडील संपत बापू शिंदे ०९ नोव्हेंबर रोजी दुपारी अरणगाव येथील शिंदे मळा शिवारात काम करत होते.

यावेळी याच परिसरात राहणारे आरोपी नितीन बाळासाहेब शिंदे, निलेश बाळासाहेब शिंदे आणि बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे हे तिघे जण तेथे आले. ​

आरोपींनी फिर्यादीचे वडील संपत शिंदे यांना तुमच्या बांधावरील शेततळे काढून घ्या, या कारणावरून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असताना फिर्यादी संभाजी शिंदे हे तेथे आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केल्याचे नमूद केले आहे. ​

त्यांच्या फिर्यादीवरून, पोलिसांनी नितीन शिंदे, निलेश शिंदे आणि बाळासाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे