ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे मारणार, नगर शहरात तरुणाच्या घरासमोर मोटारसायकलींची तोडफोड

अहिल्यानगर

”तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार मारणार आहोत,” अशी धमकी देत एका तरुणाच्या नावाने शिवीगाळ करत घरासमोर गोंधळ घातल्याची घटना जुना बाजार, भिस्तगल्ली परिसरात घडली. संतप्त आरोपींनी फिर्यादीच्या शेजाऱ्याच्या दोन मोटारसायकली, फिर्यादीच्या समजून, पाडून त्यांची तोडफोड केली. गुरुवारी (दि. ६) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

​या प्रकरणी अरफात अब्दुल रऊफ शेख (वय-३०, रा. जुना बाजार, भिस्तगल्ली) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरफात शेख हे गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना, घराबाहेरून मोठमोठ्याने शिवीगाळ करण्याचा आवाज आला. त्यामुळे ते घराच्या टेरेसवर गेले.

​त्यावेळी घरासमोर विजय गजानन भनगडे, संघराज दत्तात्रय जगताप आणि सुरज पोपट सरोदे (सर्व रा. बोहरी चाळ, रेल्वेस्टेशन) हे तिघे जण अरफात शेख यांचे नाव घेऊन शिवीगाळ करत होते. “कुठे आहे तो जहागीरदार अरफात, तो दिसला तर त्याला जिवे ठार मारणार,” अशा धमक्या ते देत होते.

​तसेच, आरोपींनी फिर्यादी शेख यांच्या घराशेजारी राहणारे मोबीन सय्यद यांच्या दोन मोटारसायकलींना लाथा मारून खाली पाडले. या मोटारसायकली अरफात शेख यांच्याच आहेत, असा समज आरोपींचा झाला होता. त्यांनी दोन्ही मोटारसायकलींचे मदगार्ड व ‘खोपडी’ फोडून नुकसान केले.

​या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे