ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

म.ए.सो. पूर्व प्राथमिक रेणावीकर शाळा सावेडी शाळेनी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून ३० विद्यार्थ्यांचा वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

अहिल्यानगर

म.ए.सो. पूर्व प्राथमिक रेणावीकर शाळा, सावेडी अहिल्यानगर. मंगळवार, दिनांक ७/१०/२०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून ३० विद्यार्थ्यांचा वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

भारतभर शिक्षण क्षेत्रात काम करणारी विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था ही शाळेत/शिशुवाटिकेत मुलांचा वैदिक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी मार्गदर्शन करते. वैदिक पद्धतीने वाढदिवस हा भारतीय संस्कृतीतील संस्कार, परंपरा आणि आध्यात्मिकतेचा संगम आहे.

आधुनिक जगात मुलं केक, मेणबत्त्या, फुगे, गाणे, पार्टी यांच्या समवेत वाढदिवस साजरा करतात. वैदिक पद्धतीने मंत्र उच्चार, होम, हवन, फुलं, तिलक अशा प्रकारे साजरा केल्याने  मुलांच्या मनात भारतीय संस्कृती, देशभक्ती,प्रेम आणि आदर भावना या भावी पिढ त रुजतात.

म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वैदिक पद्धतीने वाढदिवस हा विद्याभारतीच्या जिल्हा कार्यवाह तसेच शिशु वाटिका प्रशिक्षक सौ.प्रज्ञा असनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी नवीन पारंपारिक पोशाख घालून होम हवन करून मंत्र उच्चार करून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर मुलांना तिलक लावून औक्षण करण्यात आले. व सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचा खाऊ न देता पौष्टिक खाऊ देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी चे पदाधिकारी संस्थेचे सचिव मा.श्री. डॉ.अतुल कुलकर्णी सर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.सचिन आंबर्डेकर सर शाला समिती अध्यक्ष मा.श्री. डॉ .राजीव हजिरनीस सर शाला समिती महामात्र मा. श्री रविकांत झिरमिटे सर यांनी मुलांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

आजच्या या विशेष अशा कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर मनोहर देशपांडे यांनी यावेळेस मुलांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्याभारती संस्थेच्या जिल्हा कार्यवाह सौ.प्रज्ञाताई असनीकर यांनी पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

तसेच सकाळ पेपरच्या N I E च्या प्रमुख शिल्पा धोपावकर याही यावेळेस उपस्थित होत्या. त्यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिकासौ. माळवी मॅडम या ही कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांना शुभेच्छा दिल्या.

म ए सो पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा कुलकर्णी मॅडम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा राजेभोसले मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सौ प्रिती कोष्टी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.आसावरी मुळे, सौ.प्राजक्ता कुलकर्णी ,सौ.अश्विनी भंडारे यांनी विशेष प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे