ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वृद्धेश्वरच्या वतीने महिला बचत गटांना दोन कोटींचे कर्ज वाटप तसेच आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसही पाच लाख रुपयांचा धनादेश प्रदान.चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांचे औदार्य व प्रेरणा निश्चितच प्रशंसनीय – क्रांती चौधरी

श्रीगोंदा - अहिल्यानगर

असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यात महिला यशस्वी झाल्या नाहीत त्यांना गरज असते ती प्रोत्साहनाची आणि हे प्रोत्साहन व प्रेरणा वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी दिल्याने श्रीगोंदा तालुक्या बरोबरच राज्यातील आळंदी, पुणे या भागातील हजारो महिलांचे सक्षमीकरण झाल्याचे गौरवोदगार तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी काढले .

चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था आणि वृद्धेश्वर सोसायटीच्या वतीने दिवाळी निमित्त महिलांना २ कोटी रुपयांचे कर्ज वाटप आणि साखर वाटप प्रसंगी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक नारायण परजणे होते .

चौधरी पुढे म्हणाल्या आपण कोकणात असताना शेतकरी ते ग्राहक असा उपक्रम राबवताना तेथील स्थानिक उत्पादने महिला बचत गटामार्फत विक्रीचा प्रयोग केला होता त्यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.व महिलांना यातून चालना मिळाली .

नारायण परजणे म्हणाले महिला बचत गट चांगला व्यवसाय करत आहेत . त्यांनी चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्या प्रेरणेतून मोठे व्यवसाय करावेत . त्याला ब्रँड निर्माण केल्यास महानगरात बाजारपेठ मिळेल येथून पुणे जवळ असल्याने हा प्रयोग निश्चित यशस्वी होईल .

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी चे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे म्हणाले अतिवृष्टी , पूर, बाजारातील मंदी अशा अडचणीच्या काळात महिला बचत गटातील महिलांना आधार व्हावा म्हणून कर्ज वाटप करण्यात आले तसेच यावर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थीतीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .

सरकार त्यांना मदत करत आहे तसेच आपणही समाजाचे देणे लागतो या निस्सिम भावनेने वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी, चैतन्य महिला बचत गटांची सहकारी पतसंस्था आणि चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती ( खाजगी ) यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगीतले .

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या चेअरमन सौ.सायली वाडगे यांनी लोकांची दिवाळी झाली तरच आपली दिवाळी हि स्वामींची तळमळ असल्याने केवळ दिवाळीच्या शुभेच्छा न देता त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज वाटप आणि सोबत साखर देण्यात येते असे सांगीतले .

यावर्षी नियमित कर्ज भरणाऱ्या बचत गटातील महिलांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी दीड लाख , १ लाख व ९० हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून दिवाळी निमित्त ३०० महिलांना २ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले . तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देखील ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला .

यावेळी बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचेसूत्र संचालन रीमा घंगाळे यांनी केले तर प्रमिला पिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे