ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..

अहिल्यानगर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा : लेखी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहेत.

यामध्ये माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षांचा समावेश असेल.

प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे वेळापत्रक

इ.१२वी प्रात्यक्षिक परीक्षा :-  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) साठी, NSQF अंतर्गत व्यावसायिक विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह, प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ ते सोमवार, दि. ०९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजित केले जातील.

विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा देखील समावेश आहे.

इ.१० वी प्रात्यक्षिक परीक्षा : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इ.१०वी) साठी, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. या

मध्ये शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश असेल. दरम्यान, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी दोन्ही फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे तारखा विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाने दिले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे