ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

टक्केवारीसाठी कॉन्ट्रॅक्टरला सरकारी कर्मचाऱ्याची मारहाण..

पाथर्डी शहरातील मणिकदौंडी चौकात मंगळवारी मध्यरात्री सरकारी कॉन्ट्रॅक्टर अजिंक्यराजे गर्जे (रा. पाथर्डी) यांना पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागातील सरकारी कर्मचारी श्रीकांत पालवे (रा. धामणगाव देवी रोड, पाथर्डी) आणि प्रतीक बढे (रा. नाथनगर, पाथर्डी) यांनी टक्केवारीसाठी मारहाण करत धमकी दिली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी –  मंगळवारी (7 ऑक्टोबर) रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास श्रीकांतने दारूच्या नशेत अजिंक्यराजे यांना फोन करून टक्केवारी मागितली आणि माणिकदौंडी चौकात बोलावले.

तिथे श्रीकांत आणि प्रतीक यांनी गाडीतून उतरून अजिंक्यराजे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, तोंडावर आणि हातावर जखमा झाल्या. यात त्यांची दहा ग्रॅमची सोन्याची अंगठी गहाळ झाली.

दोघांनी ‌‘पुन्हा नादी लागलास तर जीवे मारू, अशी धमकी देऊन पळ काढला. अजिंक्यराजे गर्जे यांच्या या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे