ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा वाढदिवसा निमित्त सन्मान

सोलापूर

पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय श्री.दशरथजी गोप साहेबांचे वाढदिवसानिमित्त पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने बॅंक आॅफ महाराष्ट्र चे माजी जनरल मॅनेजर तथा संघाचे जेष्ठ सदस्य उमापती मिठ्ठापल्ली आणि ग्रामीण बॅंकेचे सेवानिवृत्त मॅनेजर अविनाश संगा यांचे हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यांत आले.

यावेळी संघाचे सचिव यशवंत इंदापुरे, खजिनदार नागनाथ गज्जम, संघाचे कार्यकारी सदस्या संगीताताई इंदापुरे, राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेचे माजी शिक्षिका भारती सग्गम, एलपीजी गॅस कंपनीचे माजी मॅनेजर शामकुमार बेनगिरी, सोलापूर महानगर पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी भुलिंगम रापेल्ली, जनता सह.बॅंकेचे माजी शाखा प्रमुख सुशिल कुमार चिलका, रामकृष्णपंत बेत कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक नागनाथ नोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी दशरथ गोप यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देऊन अभिष्ठचिंतन केले. सदर प्रसंगी विद्या दशरथ गोप, वेदांत गोप, महाराष्टट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संघमचे अध्यक्ष अॅड.श्रीनिवास कटकूर, इंजिनिअर विभाग संघमचै सचिव प्रशांत गाजूल , पद्मशाली शिक्षण संस्थेतील विविध महाविदयालयाचे शाळेचे प्राचार्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक तसेच शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे