ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…

मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्रे खा. सुनेत्रा पवार यांच्या हाती येणार हे स्पष्ट झाले आहे.

लोकभावना आणि पक्षातील नेते, आमदारांचा आग्रह लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि नरेश अरोरा हे देखील बारामती येथून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

शनिवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. शनिवारीच सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक दुपारी 2 वाजता विधिमंडळातील सभागृहात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.

त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी 5 वाजता पार पडेल, अशी माहिती आहे. यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार हे बारामतीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

अजित पवार यांच्या निधनामुळं बारामतीकरांवर दु: खाचा डोंगर कोसळला. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होईल. त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल.

शुक्रवारी अजित पवार यांना सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्यांच्या अस्थी त्या सोनगाव येथील नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे