ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात दांडियातील वादातून युवकावर चाकूने वार

अहिल्यानगर

दांडिया खेळतांना झालेल्या किरकोळ वादातून एका 21 वर्षीय डिलिव्हरी बॉयवर चाकू आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव परिसरात घडली आहे. ओंकार शिंदे (वय 21, रा. भिंगार) असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी ओंकार शिंदे याने दिलेल्या जबाबावरून ओंकार वाघ व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार शिंदे हा गुरुवारी रात्री आपल्या मित्रांसोबत संजोग लॉन येथे दांडिया खेळण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची तोंडओळख असलेल्या ओंकार वाघ याने जवळ येऊन त्याला मजा जास्त हवेत उडू नकोस अशी धमकी दिली होती.

दांडिया खेळून झाल्यावर रात्री सव्वादहाच्या सुमारास ओंकार शिंदे आपल्या मैत्रिणींना सोडण्यासाठी बोल्हेगाव येथील दत्त मंदिरा जवळून जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ओंकार वाघ व त्याच्या दोन साथीदारांनी ओंकार शिंदेच्या दुचाकीला धडक देऊन त्याला खाली पाडले.

‘कोणी मध्ये आले तर मारून टाकीन’ अशी धमकी देत ओंकार वाघ याने ओंकार शिंदेच्या पोटावर चाकूने वार केला. तर ओंकार वाघच्या इतर साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

या हल्ल्यात ओंकार शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्ल्यावेळी घाबरल्याने त्याचे मित्र आणि मैत्रिणी पळून गेले. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्याला रुग्णालयात दाखल केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे