ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालक मंदिर महिला मंडळ शाळेत मातापालक सभा व भोंडला उत्साहात साजरा

अहिल्यानगर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिवर्तन प्रतिष्ठान संचलित बालक मंदिर महिला मंडळ शाळेत मातापालक सभा आणि भोंडल्याचा कार्यक्रम शनिवार तारीख 27 सप्टेंबर 2025 रोजी साजरा झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ ज्योती केसकर होत्या. तसेच अॅडव्होकेट श्रीमती मीनाताई शुक्रे ,माजी नगरसेविका सौ. सोनालीताई चितळे, पोलीस उपनिरीक्षक सौ. सीमाताई केसरकर, ॲड . सौ. प्रज्ञा असनीकर या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. तसेच नगर लायनेस क्लबच्या सौ एडके व श्रीम. निसळ व महिला मंडळ संस्थेच्या संचालिका सौ. पद्मजा धोपावकर आणि सौ. वडेताई यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड व नोटरी मीनाताई शुक्रे यांनी मातापालक व विद्यार्थिनी यांना तीन कायद्यांविषयी माहिती दिली. यामध्ये माहितीचा अधिकार कायदा, पॉक्सोकायदा , महिला सुरक्षा कायदा यांचा समावेश होता .तसेच समुपदेशक सौ प्रज्ञा असनीकर यांनी सांगितले की मुलांनी सुद्धा मुलींशी व स्त्रियांशी चांगले वर्तन करण्यासाठी मुलांना प्रशिक्षित करावे असे सांगितले. कुटुंबातील आईचे वर्तन हे मुलींसाठी आरसा असते असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सौ. सीमा केसरकर म्हणाल्या की आपल्या सद्सद्विविवेक बुद्धीला पटेल तेच काम करावे.

यावेळी त्यांनी गुरु ठाकूर यांची ‘असे जगावे’ ही कविता सादर केली. त्या म्हणाल्या की मुलांनी स्वप्न पहावेत आणि पूर्ण करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत. तसेच माजी नगरसेविका सौ. सोनाली ताई चितळे यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत असे आवर्जून सांगितले.

याप्रसंगी सौ. निसळ व सौ. एडके यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी केले.

सूत्रसंचालन सौ. प्रतिभा पवार यांनी केले.यावेळी सौ. सीमा केसरकर , सोनाली चितळे, मीना शुक्रे, अजिता एडके, कल्पना निसळ , प्रज्ञा असनीकर यांचा संस्थेतर्फे सत्कार सौ. ज्योती केसकर यांनी केला .आभार निरुपमा देशपांडे यांनी मानले.

सूत्रसंचालन ठकूबाई पवार यांनी केले . सर्व विद्यार्थिनी, माता पालक भगिनी, आमंत्रित पाहुण्या यांनी नवरात्री निमित्त भोंडला व गरबा याचा आनंद घेतला .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. खाऊवाटप केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे